Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावनाकाबंदीत कारमधून 40 किलो गांजा जप्त; दोघे फरार

नाकाबंदीत कारमधून 40 किलो गांजा जप्त; दोघे फरार

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी कारवाईत पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा चोपड्याकडून जळगावकडे येणाऱ्या मार्गावर नाकाबंदी दरम्यान एका कारमधून तब्बल ४० किलो गांजा जप्त केला. जप्तीची अंदाजित किंमत १० लाख रुपये असून, कारसह एकूण २० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मात्र, कारमधील दोन्ही संशयित अंधाराचा फायदा घेत फरार झाले.

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित कारला थांबण्याचा इशारा देताच चालकाने वेग वाढवत घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी तातडीने पाठलाग केला असता, आरोपींनी धरणगाव बसस्थानकाजवळ यू-टर्न घेत पारोळा रस्त्याकडे कार वळवली. पुढे झाडाझुडपांच्या आड कार सोडून ते फरार झाले. कारची तपासणी करताना पोलिसांना ४० किलो गांजा सापडला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या