जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मेहरूण येथील लिटल चॅम्प्स प्री-प्रायमरी स्कूल, जय दुर्गा प्राथमिक-माध्यमिक विद्यालय व कै. कौतिक चावदस महाजन उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 12 ऑगस्ट 2025 रोजी ‘हर घर तिरंगा’ उपक्रमानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात बाल चित्रकला स्पर्धेने झाली, ज्यात लहानग्यांनी तिरंग्याचे महत्व, स्वातंत्र्य आणि देशभक्ती या विषयांवर सुंदर चित्रे रेखाटली. त्यानंतर 100 फुटांचा तिरंगा घेऊन परिसरातून तिरंगा यात्रा काढण्यात आली. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला.
या वेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. सागर कोल्हे व माध्यमिक विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. सविता लोखंडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. देशभक्तीचा संदेश देत हा उपक्रम उत्साहात पार पडला