सिल्लोड | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- सिल्लोड येथे पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान मेळावा या प्रदर्शनामध्ये ,श्री सरस्वती भुवन प्रशाला भराडी या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रशालेतील विद्यार्थिनी कु. वैष्णवी भगवान शिंदे ( वर्ग नववा ) या विद्यार्थिनीने काँटम युग: संभाव्यता आणि आव्हाने या विषयावर सादरीकरण करून, शैक्षणिक ध्वनी चित्रफितीद्वारे उत्कृष्ट सादरीकरण केले.
या सादरीकरणानिमित्त 79.86 टक्के गुण प्राप्त करून वैष्णवी शिंदे यांनी 23 स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक पटकावला .या यशाबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष नरेंद्र अग्रवाल .प्रशालेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे . उपमुख्याध्यापक सुनील महालपुरे ,पर्यवेक्षक श्री. बोरसे सर यांनी अभिनंदन केले.तसेच विज्ञान विभाग प्रमुख शामकांत पाचपुते आणि विज्ञान विभाग सहप्रमुख लोलपोड साईनाथ आणि सर्व शिक्षकांनी प्रसंगी सहकार्य केले. या यशाबद्दल परिसरातून सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.