जळगाव/प्रतिनिधी/पोलिस दक्षता लाईव्ह :- किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनिलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेज, मेहरुण येथे दि 13 ऑगस्ट 2025 वार बुधवार रोजी “हर घर तिरंगा” अभियान अंतर्गत परिसरातील नागरिकांना जागृत आणि प्रोत्साहित करण्यासाठी तसेच आपल्या राष्ट्रध्वजाबाबत जागरूकता वाढवून वैयक्तिक बंध निर्माण होण्याकामी परिसरात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी भला मोठा तिरंगा बालकांनी हाती घेऊन परिसरात रॅली काढण्यात आली.यावेळी उत्साहाला उधाण आले होते. कार्यक्रमाला माजी महापौर जयश्री महाजन यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले.