Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमअरे..बापरे... कॅफेच्या नावाआड भलतच काही... पडद्याआड अश्लील चाळे ; रामानंदनगर पोलिसांची कारवाई

अरे..बापरे… कॅफेच्या नावाआड भलतच काही… पडद्याआड अश्लील चाळे ; रामानंदनगर पोलिसांची कारवाई

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जामनेर तालुक्यातील बेटावद येथील घटनेनंतर शहरातील रामानंदनगर परिसरात अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गुरुवार, १४ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता ‘कॅफे कॉलेज कट्टा’ नावाच्या कॅफेवर पोलिसांनी छापा टाकून शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पडद्याआड अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडले.

रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कॅफेमध्ये प्लायवूडचे कपार्टमेंट, पडदे व अंधार करून विद्यार्थ्यांना गैरप्रकार करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचे निष्पन्न झाले. छाप्यात सात जोडपी आढळून आली. त्यांना समज देऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात सोडण्यात आले. कॅफेचा परवाना नसल्यानं चालक मुकेश वसंत चव्हाण (वय ३०, रा. रोटवद, ता. जामनेर, सध्या लाडवंजारी मंगल कार्यालय, जळगाव) याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक सचिन रणशेवरे व पथकाने केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या