जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- गणेशोत्सव हा भक्ती, संस्कृती आणि समाजातील ऐक्याचा प्रतीक असून, तो आनंद, सुरक्षितता आणि जबाबदारीने साजरा करण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री पाटील यांनी गणेश मंडळांनी सामाजिक संदेश देणारी आरास उभारावी तसेच वर्गणीतून काही निधी वंचितांच्या कल्याणासाठी वापरावा, यामुळे जिल्ह्याची प्रतिमा उंचावेल असे नमूद केले.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
> महावितरणला अखंडित वीजपुरवठ्याच्या सूचना
> जिल्ह्यात २,९४६ गणेश मंडळांची नोंद
> मिरवणूक व विसर्जनावेळी आवाज मर्यादा ५५ डेसिबल
> वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग व वेळांचे नियोजन
> पोलीस, अग्निशमन, आरोग्य, वीज, स्वच्छता यंत्रणांची समन्वयित तयारी
या बैठकीस आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांसह विविध विभागांचे अधिकारी आणि मंडळ पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाने सर्व गणेश मंडळे व नागरिकांना कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे तसेच उत्सवातून समाजातील ऐक्य आणि बंधुत्व वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले आहे.