नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- न्यू इंग्लिश स्कूल, नशिराबाद येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. योगेश नारायण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर इयत्ता दहावीतील स्काऊट-गाईड व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून ध्वजाला मानवंदना दिली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कवायतीतील भारतीयम, मुद्दल, डंबेल्स, मास पीटी व घुंगरूकाठीचे देखावे सादर केले. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. विनायक वाणी, उपकार्याध्यक्ष श्रीमती प्रमिलाताई महाजन, ज्येष्ठ संचालक श्री. जनार्दन दादा माळी, संचालक श्री. राजू दादा पाटील, श्री. प्रदीपजी देशपांडे, संचालिका श्रीमती सुनिता पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. ए. बनसोडे, उपमुख्याध्यापक श्री. ए. डी. चौधरी, पर्यवेक्षक श्री. एस. एन. पाचपांडे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. प्रवीण महाजन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.