जळगाव | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या जळगाव जिल्ह्याच्या दौ-याच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यान्वयीन यंत्रणांची आढावा बैठक, जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हा नियोजन भवन, जळगांव येथे पार पडली.
याप्रसंगी जलसंपदामंत्री गिरिश महाजन, पाणीपुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्रोद्योगमंत्री संजय सावकारे, माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार राजुमामा भोळे, आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुषजी प्रसाद, पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व आदी मान्यवर उपस्थित होते.