पंढरपूर | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात सुरक्षा रक्षकांना हॅन्डगोल्ज बंधनकारक
पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
यामध्ये देवाच्या गाभाऱ्यात भाविकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या महिला आणि पुरुष सुरक्षा कर्मचार्यांना हॅन्डगोल्ज वापरणे आजपासून बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. गाभार्यात दर्शन रांग गतीमान करताना कर्मचाऱ्यांकडून भाविकांना स्पर्श करावा लागतो. त्यामुळे भाविक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण होतात. हे वाद टाळण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी हॅन्डगोल्ज वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.