जळगाव | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- शहरातील भाविक-भक्तांसाठी अयोध्या-काशी मोफत रेल्वेचे आयोजन करण्यात आले असता, मंत्री गिरीष महाजन तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ ,आ.राजू मामा भोळे यांच्यासह उपस्थित राहून सदर गाडीस हिरवा झेंडा दाखवून जळगाव रेल्वे स्टेशन येथून भाविकांसोबत यात्रेला रवाना झालो.
यावेळी मंत्री गिरीष महाजन व केंद्रीय युवक व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्यासह खासदार श्रीमती स्मिता वाघ, भाजपा पूर्व व पश्चिम जिल्हाध्यक्ष, सर्व भाजपा जिल्हा पदाधिकारी आणि मंडळ अध्यक्ष, तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते, रेल्वेचे मिलिंद साळुंखे, जळगाव रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर चौधरी सर, श्री.नन्नवरे हे उपस्थित होते.