Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमजळगाव हादरले! पंचमुखी मंदिराजवळ तरुणाचा खून

जळगाव हादरले! पंचमुखी मंदिराजवळ तरुणाचा खून

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरात सोमवारी पहाटे घडलेल्या खुनाच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रामेश्वर कॉलनीतील २६ वर्षीय विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची याची अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली.

ही घटना सोमवारी १८ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास पंचमुखी हनुमान मंदिराजवळील एमएसईबी कार्यालयाजवळ घडली. विशाल याच्यावर ६ ते ७ हल्लेखोरांनी अचानक धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा जीव घेतला. वाराच्या तीव्रतेमुळे तो जागीच कोसळला व मृत्यूमुखी पडला.

घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हत्येमागील कारण अद्याप गूढ
विशाल हा सोलर पॅनेल बेस बसविण्याचे काम करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. या हत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या