पिंप्री चिंचवड | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- समता भ्रातृ मंडळाचा शैक्षणिक कार्यक्रम दि.15 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना बक्षीस देण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.आशिष पाटील (प्रोफेसर), डॉ.लिना चैधरी (प्रोफेसर), डॉ. निवृत्ती नारखेडे (प्रोफेसर) यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच पाहुणे म्हणून उद्योजक विलास बोरवले, उद्योजक अनिल परतणे, उद्योजक किशोर नारखेडे, नगरसेवक नामदेव ढाके, मंडळाचे संस्थापक भागवत चौधरी, मंडळाचे अध्यक्ष हेमंत झोपे उपस्थित होते. मोठ्या संख्येने पालक सुद्धा उपस्थित होते.