जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- रोटरी क्लब जळगाव, संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग (कबचौउम विद्यापीठ) आणि जिल्हा माजी सैनिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता ला. ना. सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात भारतीय सैन्यदलातील लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे (पुणे) यांच्या प्रेरणादायी जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या व्याख्यानात ते सिंदूर व भविष्यातील युद्धे आणि युद्ध पद्धती या विषयावर संबोधित करणार आहेत. ले. जनरल खंडारे यांनी भारत सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीमधील वरीष्ठ सदस्य म्हणून काम पाहिले आहे. अजित डोभाल यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या सुरक्षेच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांनी थेट सहभाग नोंदवला आहे.
त्यांच्या अनुभवातून उलगडणाऱ्या युद्धकथा, गुप्त धोरणे आणि भविष्यातील युद्धतंत्राविषयीचे विचार ऐकण्याची ही दुर्मिळ पर्वणीच होती. नागरिक मोठ्या संख्येने व्याख्यानास उपस्थिती होते.