Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणजळगाव जिल्ह्यातील नशिराबादच्या मोहित रमेशराव येवले यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर “बेस्ट आर्टिकल अवॉर्ड”

जळगाव जिल्ह्यातील नशिराबादच्या मोहित रमेशराव येवले यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर “बेस्ट आर्टिकल अवॉर्ड”

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील KYDSCT’s College of Pharmacy मधील एम.फार्मसी (द्वितीय वर्ष) विद्यार्थी मोहित रमेशराव येवले यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ख्यातनाम European Journal of Biomedical and Pharmaceutical Sciences (EJBPS) या संशोधन पत्रिकेत “Best Article Award” मिळाला आहे.

“Development and Validation of RP-HPLC Method for Simultaneous Estimation of Indapamide and Nebivolol in Bulk and Pharmaceutical Dosage Form” या संशोधन लेखाला ऑगस्ट २०२५ (Volume 12, Issue 08) मध्ये सर्वोत्तम लेखाचा बहुमान मिळाला आहे. या संशोधन कार्यामध्ये राजेश ग. जाधव, डॉ. दिपक डि. कुम्भार, सूरज एस. पाटील व डॉ. पराग र. पाटील यांचा देखील महत्त्वपूर्ण सहभाग होता.

सध्या मोहित रमेशराव येवले हे गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे एनालिटिकल केमिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे संस्थेचे नाव देशभरात अधिक उज्ज्वल झाले आहे. संशोधनाच्या प्रवासात संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डी.एम. कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, तसेच संस्थेचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग आणि कल्पेश व्ही. सोनार यांचा अमूल्य सल्ला, मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे हे यश असल्याचे मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या