Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeभुसावळवरणगावात धक्कादायक घटना : विवाहितेच्या मृत्यूनंतर पतीवर गुन्हा दाखल

वरणगावात धक्कादायक घटना : विवाहितेच्या मृत्यूनंतर पतीवर गुन्हा दाखल

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ तालुक्यातील वरणगाव शिवारातील गट क्रमांक ७८३ मधील शेतातील विहिरीत उडी घेतलेल्या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी वरणगाव पोलिसांनी पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवारी (दि. २१ ऑगस्ट) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास भंगाळे वाडा येथील रहिवासी योगीता धीरज भंगाळे (वय ३५) यांनी शेतातील विहिरीत उडी घेतली होती. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली होती.

दरम्यान, मयत विवाहितेचे वडील सुभाष वराडे (रा. काहुरखेडा) यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पती धीरज कडू भंगाळे (रा. भंगाळे वाडा, वरणगाव) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत योगीता भंगाळे यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वरणगाव येथील भंगाळे वाडा तसेच माहेर असलेल्या काहुरखेडा गावात शोककळा पसरली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या