Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeभुसावळभुसावळमध्ये धक्कादायक घटना ; घरगुती वादातून निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

भुसावळमध्ये धक्कादायक घटना ; घरगुती वादातून निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ शहरातील विघ्नहर्ता कॉलनी परिसरात घरगुती वादातून एका निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित कर्मचाऱ्याची पत्नी, मुलगी तसेच आणखी तिघांविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवृत्त रेल्वे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुभाष शंकरराव चिखलकर (६८) हे १९ ऑगस्ट रोजी रात्री घरी असताना वाद निर्माण झाला. चिखलकर यांच्या पत्नी संगीता व मुलगी नेहा यांच्यासोबत त्यांचे परिचित संतोष सुखदेव अटवेकर व त्याची आई सखुबाई अटवेकर घरी आले. घरात प्रवेश करण्यास विरोध केल्यानंतर संतोष अटवेकर याने “हे घर नेहाचे आहे, तुला राहण्याचा अधिकार नाही” असे म्हणत चिखलकर यांना शिवीगाळ केली. त्यानंतर संतोष, सखुबाई, संगीता व नेहा यांनी मिळून घरात पडलेल्या काठ्यांनी चिखलकर यांच्यावर हल्ला केला.

दरम्यान, संगीता हिने नेहाला तलवार आणण्यास सांगितले व हल्ल्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता संतोष व संगीता यांनी चिखलकर यांचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. घराबाहेर उभा असलेला गजानन व्यंकटेशन गुरुशेट्टी यालाही हल्ल्यात सामील करण्यात आले. त्याने चिखलकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या झटापटीतून कसाबसा बचाव करून चिखलकर यांनी स्वतःची सुटका करून घेतली व आपल्या पहिल्या पत्नी मंगला यांच्या दत्तनगर येथील घरी पोहोचले. त्यानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले.

या प्रकरणी बाजारपेठ पोलीसांनी संगीता चिखलकर, नेहा चिखलकर, संतोष अटवेकर, सखुबाई अटवेकर व गजानन गुरुशेट्टी यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हा नोंदवला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या