जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- ‘आठवणी स्वातंत्र्यसैनिकांच्या’ या पुस्तकाचा समावेश कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने द्वितीय वर्ष कला शाखेत इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमात केल्याने डॉ.संजय भोकरडोळे यांचा सत्कार येथील बळवंत नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे करण्यात आला.
पतसंस्थेची रविवार दि.२४ ऑगस्ट रोजी येथील पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेमध्ये डॉ.भोकरडोळे यांचा सत्कार संचालक मंडळाच्या वतीने पतसंस्थेचे अध्यक्ष राधेश्याम लक्ष्मीकांत बजाज यांनी केला. यावेळी पतसंस्थेच्या सर्व संचालकांसह मुख्य कार्यकारी अधिकारी जयदीप शहा उपस्थित होते.