जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मेहरुण परिसरातील लिटल चॅम्प्स प्री-प्रायमरी स्कूल, जय दुर्गा प्राथमिक माध्यमिक विद्यालय व कै. कौतिक चावदस महाजन उच्च माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सव २०२५ चा शुभारंभ उत्साहात झाला. आज विद्यालयात गणेश मूर्तीची स्थापना महापौर सौ. जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आली. यानिमित्ताने विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात व लेझीम पथकासह श्री गणेशाची आगमन मिरवणूक काढली. परिसर गणेशभक्तीच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
या वेळी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सागर कोल्हे, माध्यमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. सविता लोखंडे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण पद्धतीने पार पडले.