जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील झिपरु अण्णा प्राथमिक माध्यमिक विद्यालयात आज मोठ्या जल्लोषात गणरायाचे आगमन झाले. ढोल-ताशे व लेझीम पथकाच्या गजरात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्याचे आकर्षण ठरलेल्या लेझीम पथकासह श्रीगणेशाचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती.
सदर प्रसंगी संस्था अध्यक्ष ॲड. नेमचंद येवले व सचिव मोतीलाल येवले यांच्या हस्ते श्रींची विधिवत स्थापना करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी हेमांगी येवले, प्रवीण कोळी, रवींद्र पाटील व हर्षा चिरमाडे यांचे अनमोल सहकार्य लाभले. गणेशोत्सवाच्या या मंगल वातावरणात विद्यालय परिसर गणरायाच्या जयघोषाने दुमदुमून गेला