Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यावढोदा ( फैजपूर) येथे सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत तुलसी हेल्थ केअर सेंटर...

वढोदा ( फैजपूर) येथे सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत तुलसी हेल्थ केअर सेंटर आयोजित लोकार्पण समारंभ आणि अवतरण दिन कार्यक्रम

फैजपूर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- वढोदा येथे सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट, फैजपूर संचलित तुलसी हेल्थ केअर सेंटर मार्फत प.पू. महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी जी महाराज यांचा अवतरण दिन (जन्मदिवस) आणि तुलसी हेल्थ केअर सेंटर नवीन वैद्यकीय विभागाचा लोकार्पण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्य मंत्री रक्षाताई खडसे उपस्थित होत्या. प. पू. महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी जी महाराज यांचे त्यांनी आशिर्वाद घेतले.

प. पू. महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी जी महाराज यांच्या कृपा व संकल्पातून निर्मित तुलसी हेल्थ केअर सेंटर येथे नैसर्गिक चिकित्सा, योग आणि आध्यात्मिक चिकित्सा या जीवनशैलीवर आधारित एक अद्वितीय आरोग्यधाम आहे. येथे दरमहा आयोजीत होणाऱ्या ५ दिवसांच्या निवासी शिबिरांमधून देशभरातून येणारे लोक जटिल रोग, मानसिक तणाव, शारीरिक व्याधी आणि जीवनशैलीजन्य आजारांपासून मुक्ती मिळवत आहेत.

या नव्याने स्थापन होणाऱ्या वैद्यकीय विभागात : एकत्र १२० खाटांची उपचार सुविधा स्त्री-पुरुष स्वतंत्र उपचार विभाग- गोपनीयता तसेच सुरक्षिततेसह स्टीम बाथ युनिट, वमन, मृत्तिका चिकित्सा विभाग कटि स्नान सूर्यवाष्प स्नान चिकित्सा क्षेत्र अक्युप्रेशर गार्डन, शिरोधारा, जल नेती, मालिश, योग चिकित्सा, पंचतत्त्व विभाग उत्तम निवास, आधुनिक आहार व्यवस्था, योग ध्यान सभागृह, आणि नैसर्गिक पर्यावरण, तुलसी हायड्रोथेरपी मसाज, हर्बल अक्युप्रेशर गार्डन ह्या सुविधा उपलब्ध आहे.हे केंद्र केवळ उपचाराचे ठिकाण नसून, एक आध्यात्मिक, मानसिक व शारीरिक नवजीवनाचा प्रारंभ बिंदू आहे. ही संपूर्ण व्यवस्था प.पू. महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी जी महाराज यांच्या आशिर्वाद आणि मार्गदर्शनात, अनुभवी नैसर्गिक आरोग्यतज्ज्ञ आचार्य सचिन जी यांच्या नेतृत्वात चालवली जात आहे.

यावेळी महाराज यांच्यासह जगदुरु सत्यंथाचार्य श्री ज्ञानेश्वराचार्य महाराज (तीर्थधाम प्रेरणापीठ अहमदाबाद), श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज (वृंदावन धाम पाल), आचार्य मानेकर बाबा शास्त्री (सावदा) श्रद्धेय योगी दत्तनाथजी महाराज (शिंदखेडा), ह.भ.प.रवींद्र जी हरणे महाराज (महाराज मुक्ताई संस्थान), परमपूज्य अनंत प्रकाश शास्त्री (स्वामीनारायण गुरुकुल), परमपूज्य शामचैतन्यजी महाराज, संत श्री स्वरूपानंद महाराज, ह.भ.प. नितीन महाराज, प.पू. सर्वचैतन्यजी महाराज (कन्नड आश्रम), आरोग्यतज्ज्ञ आचार्य सचिन पाटील तसेच मंत्री संजय सावकारे, खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, खंडवा लोकसभा खासदार ज्ञानेश्वर पाटील, माजी मंत्री आमदार श्रीमती अर्चनादीदी चिटणीस, आमदार अमोल हरिभाऊ जावळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, नेपानगर आमदार मंजू दादू आणि सर्व संत व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या