Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमजळगाव महिला अत्याचार प्रकरण : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील...

जळगाव महिला अत्याचार प्रकरण : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची तातडीने उचलबांगडी ; चार्ज राहुल गायकवाडांकडे

प्रतिनिधी | जळगाव | पोलीस दक्षता लाईव्ह :- महिलेवर अत्याचाराच्या आरोपानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. त्यांना नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले असून, त्यांच्या जागी राहुल गायकवाड यांच्याकडे एलसीबीचा चार्ज सोपविण्यात आला आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी संदीप पाटील यांच्यावर गंभीर आरोप उपस्थित केले. पाटील यांनी एका महिलेला विवाहाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आमदार चव्हाण हे स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सायंकाळी आदेश काढून पाटील यांची उचलबांगडी केली. त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेत कार्यरत पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्याकडे एलसीबीचा प्रभार सोपविण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या