Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeनशिराबादईद-ए-मिलाद मिरवणुकीसंदर्भात नशिराबाद पोलिस ठाण्यात बैठक; शांततेत सण साजरा करण्याचे आवाहन

ईद-ए-मिलाद मिरवणुकीसंदर्भात नशिराबाद पोलिस ठाण्यात बैठक; शांततेत सण साजरा करण्याचे आवाहन

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आज दि. 01 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7.25 ते 8.05 वाजेच्या दरम्यान नशिराबाद पोलिस स्टेशन येथे ईद-ए-मिलाद सणाच्या अनुषंगाने मोहल्ला कमिटी सदस्य, मुस्लिम पंच कमिटी नशिराबाद, भादली बुद्रुक, मन्यारखेडा फातिमानगर येथील ईद-ए-मिलाद मिरवणूक पदाधिकारी यांची विशेष बैठक घेण्यात आली.

या बैठकीदरम्यान वरिष्ठांकडून प्राप्त मार्गदर्शन व सूचना समजावून सांगण्यात आल्या. आगामी मिरवणुका शांततेत, अनुशासनात व कायदा सुव्यवस्था राखून पार पाडाव्यात, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले. ईद-ए-मिलादनिमित्त नशिराबाद व भादली बुद्रुक येथील मिरवणूक दि. 06 सप्टेंबर 2025 रोजी, तर फातेमा नगर मन्यारखेडा शिवार येथील मिरवणूक दि. 05 सप्टेंबर 2025 रोजी काढण्यात येणार आहे. तसेच ईद-ए-मिलाद जुलूस मिरवणूक दि. 08 सप्टेंबर 2025 रोजी पार पडणार आहे. सदर बैठकीला 50 ते 60 सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या