नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद शहरातील प्रसिद्ध कल्पना गणेश सेवा मंडळात यावर्षी गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून नगरपरिषद नशिराबादचे मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांच्या हस्ते महाआरती पार पडली. मंडळ स्थापनेपासून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देत असल्यामुळे नशिराबादात या मंडळाचे विशेष स्थान आहे.
सन 1972 साली मंडळाची स्थापना मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांमार्फत करण्यात आली. स्थापनेपासूनच मंडळाने विविध सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक स्पर्धा तसेच देशभक्तीपर कार्यक्रमांमध्ये सातत्याने सहभाग नोंदवला आहे.
सन 2003 मध्ये श्री इच्छापूर्ती गणपती व श्री गजानन महाराज मंदिराची स्थापना करण्यात आली. तसेच 2025 साली शासन निधीतून मंडळाला सामाजिक सभागृह बांधून देण्यात आले असून या कार्याबद्दल मंडळ शासनाचे सदैव ऋणी असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे वेळोवेळी मिळणारे मोलाचे मार्गदर्शन व तरुण कार्यकर्त्यांचा उत्साही सहभाग.
कल्पना गणेश मंडळ यावर्षीची गणेशोत्सव कार्यकारिणी.
अध्यक्ष- सनी पाटील, उपाध्यक्ष- गजानन जंगम, खजिनदार- हर्षल जैन, सचिव- हरीश खुंटे, सदस्य- दीपक नाईक, मंगेश जैन, हितेश रत्नपारखे, चेतन वाणी, राजेश जाधव, गणेश माळी, मनोज खुंटे, शुभम अहिरे, परेश जैन, प्रसाद नाईक, प्रशांत वाणी, विशाल टापरे, स्वप्निल जैन, वैभव कासार, शुभम जैन, कपिल कोष्टी, दर्शन रत्नपारखे, अतुल इंगळे, सागर अहिरे, भावेश कासार, शुभम टापरे, पराग कुलकर्णी. तसेच मंडळात बालमित्र मंडळ देखील उत्साहाने कार्यरत आहे.