जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी “एक कुटुंब – एक रोप” उपक्रमांतर्गत एक हजार रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मागील १७ वर्षांपासून काव्यरत्नावली चौक येथे पर्यावरणपूरक व आदर्श गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदा मंडळातर्फे वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारी रोपांपासून साकारलेली सजीव बल्लाळेश्वर गणपतीची प्रतिकृती खास आकर्षण ठरली. विसर्जनाच्या दिवशी प्रसादासोबत कुंड्यांसकट रोपांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
कार्यक्रमप्रसंगी जैन इरिगेशनचे अनिल जोशी, मंगलसिंग राठोड, देवेंद्र पाटील, युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडिया यांच्यासह अनेक मान्यवर व सदस्य उपस्थित होते.