यावल: बाबूजीपूरा भागातील अमोल बालक मोहम्मद हन्नान खान मज्जिद खान वधाची धक्कादायक माहिती आली समोर..
यावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- यावल तालुक्यातील बाबूजीपूरा भागात एका ६ वर्षीय बालकाचा अमानवी खून प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे. ईदच्या दिवशी अचानक बेपत्ता झालेला मोहम्मद हन्नान खान मज्जिद खान याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी जळालेल्या अवस्थेत शेजारच्या घरात आढळून आला. पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपी शेख शाहिद शेख बिस्मिल्ला (वय २२) याला ताब्यात घेतले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
शुक्रवार दि. ५ रोजी संध्याकाळी हन्नान खान बेपत्ता झाल्याची माहिती कुटुंबीयांनी यावल पोलीस स्टेशनला दिली होती. त्याचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय, ग्रामस्थ आणि पोलीस युनिटने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. परंतु, दुसऱ्या दिवशी शनिवार सकाळी साडेनव्वद वाजता शेजारील घराच्या दुसऱ्या मजल्यावर जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र शोककळा पसरली.
पोलिसांनी तपासात संशयित आरोपी शेख शाहिद शेख बिस्मिल्ला याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने अमुच्हा करत बालकाचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या माहितीप्रमाणे, जुन्या वादातून आरोपीने हन्नान खान याचा गळा घालून हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.
सुरुवातीला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असली तरी, आतापर्यंतच्या तपासात ही हत्या असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे हन्नान खान याचा आजोबा फिर्यादीदार म्हणून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
या घटनेमुळे यावल तालुक्यात मोठा खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यावल पोलीस प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, आरोपीच्या पाठीमागील पुरेसे कारण आणि इतर सहकार्याऱ्यांचा शोध घेत आहे.