Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावस्व.कांताई जैन यांच्या स्मृतिदिनी ४४५ सहकाऱ्यांनी केले रक्तदान.

स्व.कांताई जैन यांच्या स्मृतिदिनी ४४५ सहकाऱ्यांनी केले रक्तदान.

जळगाव | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या पत्नी स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षी ४४५ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. तसेच जळगाव शहरातील सेवाभावी संस्थांमध्ये स्नेहाच्या शिदोरी या उपक्रमांतर्गत सुमारे ५५० जणांना मिष्टान्न पाकिटांचे वाटप करण्यात आले.

स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त ८ सप्टेंबर रोजी कंपनीच्या देशभरातील प्रमुख आस्थापनांमध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले होते. यात जैन प्लास्टिक पार्क येथे २१७, फूड पार्क ११७ , अलवर ४, बडोदा 9, चित्तूर २५, हैदराबाद ८, उदमलपेट येथील ६ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. जळगावमध्ये जैन प्लास्टिक पार्क-बांभोरी, जैन फूडपार्क आणि भारतातील चित्तुर, बडोदा, हैद्राबाद, उदमलपेठ या ठिकाणी देखील जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी रक्तदान केले. प्लास्टिक पार्क, टी.सी.पार्क आणि जैन फूड मॉल येथील सहकाऱ्यांसाठी प्लास्टिक पार्क येथील डेमो हॉलमध्ये तर जैन अँग्री पार्क, फूड पार्क, एनर्जी पार्क आणि डिव्हाईन पार्क येथील सहकाऱ्यांसाठी फूड पार्क येथील प्रशासकीय इमारतीजवळ रक्तदान शिबीर घेण्यात आले. सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे शिबीर घेण्यात आले.

सामाजिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर जैन इरिगेशन कंपनीचे नाव जेव्हा जेव्हा समोर येते, तेव्हा तेव्हा लौकीकार्थाने केलेल्या सामाजिक कार्याची नोंद ठळकपणे घेतली जाते. कंपनीचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी सुरु झालेल्या सामाजिक कार्याला आजही तितक्याच जोमाने प्रवाहित ठेवले आहे. स्व.कांताबाई जैन यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर हे त्याचेच एक प्रतीक होय.
प्लास्टिक पार्क येथील शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी रेडक्रॉस बल्ड बँकेच्या चेअरमन मंगला ठोंबरे, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, रेडक्रॉसच्या पीआरओ उज्ज्वला वर्मा, डॉ.राजकुमार वाणी, जिल्हा रुग्णालयाचे डॉ.राहुल पाटील, डॉ.विद्या शिरसाठ, डॉ.कपिल पाटील, जैन इरिगेशनचे सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट (पर्सेनल) सी.एस.नाईक, राजश्री पाटील, किशोर बोरसे, डॉ.अश्विनी पाटील, अश्विनी खैरनार के.बी.सोनार, गोरख म्हेत्रे, डॉ.अनिल पाटील, डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील, के.एल.नेमाडे आणि मानव संसाधन आणि कार्मिक विभागातील सर्व सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.

फूड पार्क येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन विजय मुथा यांनी केले. यावेळी व्ही.पी.पाटील, सुनील गुप्ता, संजय पारख, किशोर बाविस्कर, जी. आर.चौधरी, जी.आर.पाटील आणि इतर सहकारी उपस्थित होते. फूड पार्क येथे एकूण ११७ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. गोळवलकर ब्लड बँक, गोदावरी ब्लड बँकेने रक्तसंकलन केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या