Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावजळगाव: अवैध जुगार अड्ड्यावर धाड, १६ जण ताब्यात ; १२ लाखांचा मुद्देमाल...

जळगाव: अवैध जुगार अड्ड्यावर धाड, १६ जण ताब्यात ; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त.

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी ८ सप्टेंबर पाळधी भागात एका अवैध जुगार अड्ड्यावर धाड दिली. या कारवाईत पोलिसांनी १६ आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोनसह एकूण १२ लाख २४ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामुळे अवैध जुगारकऱ्यांच्या धंद्याला मोठा धक्का बसला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे पथक तयार

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांना पाळधी परिसरात अवैध जुगार अड्ड्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे तत्काळ एक विशेष पथक तयार केले गेले. पोलीस उपनिरीक्षक श्री. शरद बागल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पाळधी येथील शाम कॉलनीतील एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर चाललेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली.

१६ जण रंगेहाथ पकडले

पोलिसांनी छापामध्ये १६ आरोपींना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. या आरोपींकडून एकूण ७२ हजार २६० रुपये रोख रक्कम आणि ५ लाख २ हजार रुपयांची किंमत असलेले विविध कंपनींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. एकूण जप्त केलेला मुद्देमाल १२ लाख २४ हजार २६० रुपये इतका आहे. पोलिसांनी या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस टीमचे नेतृत्व आणि सहकार्य

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली गेली.

मुख्यपथकात पुढील पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता:

उपनिरीक्षक शरद बागल, पो.हे. कॉ.अक्रम शेख, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, नितीन बाविस्कर, सलीम तडवी, विनोद पाटील, विजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी, रवींद्र कापडणे, सिद्धेश्वर डापकर, राहुल रगडे, रतन गिते, मयूर निकम, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल भारत पाटील, महेश सोमवंशी, प्रमोद ठाकूर, शिवाय पाळधी दूरक्षेत्रातील सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल धोबी व रवींद्र चौधरी यांनीही या धाडीत महत्त्वाचे सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या