Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगावआषाढी एकादशी निमित्त जय दुर्गा विद्यालयात दिंडी सोहळा

आषाढी एकादशी निमित्त जय दुर्गा विद्यालयात दिंडी सोहळा

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव येथील जय दुर्गा भवानी क्रीडा मंडळ, मेहरूण संचलित लिट्ल चॅम्प्स प्री-प्रायमरी स्कूल, जय दुर्गा प्राथमिक, माध्यमिक आणि कै. कौ. चा. महाजन उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले.

दि.६ जुलै  रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रखूमाई यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. पूजन महापौर मा. सौ. जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सागर कोल्हे सर, ज्येष्ठ शिक्षिका सविता लोखंडे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.शालेय परिसरातून निघालेली दिंडी नीलकंठ नगर, सप्तशृंगी कॉलनी, स्वामी समर्थ चौक, आदित्य चौक, तुळजा माता नगर या परिसरात फिरली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत टाळ-मृदुंगाच्या गजरात सहभाग नोंदवला.

कार्यक्रमात संतचरित्र, भक्तिगीते, नृत्य सादरीकरण अशा विविध सादरीकरणांद्वारे विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला. समर्थ ठाकरे, अश्विनी चौधरी, कोमल निकम, राधिका चव्हाण, साक्षी पाटील, मोनाली हटकर, तुषार नन्नवरे, भाग्यश्री हटकर यांनी विशेष सहभाग घेतला.कार्यक्रमाच्या सांगतेनंतर विद्यार्थ्यांना मा.महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले. यामध्ये साबुदाणा, राजगिऱ्याचे लाडू यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या