भंडारा/ प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भंडारा जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या ३७ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे. तुमसर तालुक्यातील येरली येथील आश्रमशाळेत हा प्रकार घडला. मुलांना गुरूवारी दुपारी जेवायला बटाटा, वाटाणा, पोळी, वरण, भात असा आहार देण्यात आला होता. काही वेळाने मुलांच्या पोटात दुखायला लागलं. तर काहींना चक्कर आली.. याची तक्रार विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे केली. विद्यार्थ्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चौघांची प्रकृती गंभीर आहे, उर्वरित ३३ जणांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.