पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- आजचे राशिभविष्य दि १६ ऑक्टोबर २०२३ सोमवार
आज तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल, दिवस आनंदात पार पडेल.
मेष : आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. जोडीदारासोबत मूड एकदम बहारदार राहील. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. घरातील कुठली वार्ता ऐकून तुम्ही भावुकही होऊ शकतात.
वृषभ : पैसा कमावण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा. वरिष्ठ सहकाऱ्यांना आणि बॉसला आपल्या घरी बोलाविण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. आज तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षाकडून काही वाईट वार्ता मिळू शकते.
मिथुन : तणावाकडे दुर्लक्ष करू नका. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. जोडीदार आज शृंगार करताना दुखावले जाल.
कर्क : धनलाभ होण्याची शक्यता. आपल्या पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. आज तुम्ही शृंगाराचा परमोच्च आनंद घेणार आहात.
सिंह : नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल. तुमचा जोडीदार हा देवदूतच याची आज तुम्हाला जाणीव होईल.
कन्या : गुंतवणुकीतून फायदा संभवतो. घरगुती कामाचा पसारा, ताण कमी करण्यासाठी आपल्या पत्नीला मदत करा. तुमची प्रगती आणि समृद्धी होईल असे नवे प्रस्ताव तुम्हाला नातेवाईकांकडून मिळतील. तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील.
तूळ : गुंतवणुकीतून फायदा होईल. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकतात. तुमच्या जोडीदाराची प्रकृती ढासळल्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल.
वृश्चिक : आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल. कुटुंबातील समस्या सोडविण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी मिळेल. जोडीदाराचा मूड ऑफ असताना तोंडातून चकार शब्दही काढू नका.
धनु : आर्थिक चणचण जाणवेल. प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा. आज तुम्ही मेहनत केलीत तर यश निश्चित मिळेल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका. जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल.
मकर : शेअर बाजारात नुकसान होऊ शकते. वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. संघर्षाची स्थिती निर्माण होईल अशी कृती करण्याचे तुम्ही टाळा. फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात. कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल.
कुंभ : बिझनेस करताना आज खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता अन्यथा आर्थिक नुकसान संभवते. जोडीदार आज रोमॅण्टीक मूडमध्ये असेल. तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्मांचे परिणाम आज भोगावे लागणार आहेत. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे.
मीन : नफा होईल. पाहुण्यांशी असभ्य वर्तन करू नका. ऑफिसमध्ये आज तुम्हाला स्थितीला समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता. तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलू नका. लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल
रोजच्या जीवनातील आपल्या राशीतील राशीभविष्य पाहण्यासाठी भेट द्या पोलीस दक्षता लाईव्ह न्यूज ला.
आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन ला लिंक सेव करा👇