मुंबई /पोलीस दक्षता लाईव्ह टीम: – न्यायालय व संविधानाशी संबंधित मुद्यांवर घाईघाईत निर्णय घेता येत नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार गंभीर आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सरकार सोडवणारच, न्यायालयात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच स्पष्टपणे सरकारची भूमिका मांडली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. मात्र हा प्रश्न गंभीर आहे. संविधान आणि न्यायालयाशी संबंधित प्रश्नावर घाईघाईत निर्णय घेता येत नाही.आम्हाला मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यायचे आहे, त्यामुळे आम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. ओबीसी जनगणनेवर आम्ही यापूर्वीच आमची भूमिका मांडली आहे. मागासवर्गीय आयोगाच्या पुनर्गठनाबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील.” असं फडणवीस म्हणाले.