Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमप्राथमिक शिक्षकाची निर्दोष मुक्तता ; पाच वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर न्याय...आरोपीने व्यक्त केले...

प्राथमिक शिक्षकाची निर्दोष मुक्तता ; पाच वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर न्याय…आरोपीने व्यक्त केले समाधान..!

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- प्राथमिक शिक्षक संदिप पाटील (रा. जळगाव) यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, जळगाव यांनी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. भारतीय दंड विधानाच्या 498 अ, 323, 504, 506 या कलमांअंतर्गत दाखल असलेल्या प्रकरणात तब्बल पाच वर्षे चाललेल्या खटल्यात न्यायालयाने 14 जुलै रोजी हा निर्णय दिला.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी (शिक्षिका) यांनी आपले पती संदिप पाटील (प्राथमिक शिक्षक, कानळदा) यांच्यावर सप्टेंबर 2020 मध्ये ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. फिर्यादीने त्यांच्या तक्रारीत मानसिक व शारीरिक छळ, पगार हिसकावणे, पैशांची मागणी व गैरवर्तनाचे आरोप केले होते.या प्रकरणात तपासी अधिकारी सुशील पाटील यांनी तपास करून साक्षी व पुरावे न्यायालयात सादर केले. मात्र, फिर्यादी, तिचे वडील, बंधू, तसेच शेजारी यांच्या साक्षींमधून कोणतीही ठोस पुष्टी झाली नाही. न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की, आरोपीला गोवण्याचा प्रयत्न झाला आहे. हे आरोप हेतुपुरस्सर मानसिक त्रास आणि बदनामीसाठी लावण्यात आले होते.संदिप पाटील यांनी 2020 ते 2025 या कालावधीत तब्बल 25 वेळा न्यायालयात हजेरी लावली. त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवत हा लढा दिला. न्यायालयीन संघर्षात त्यांच्या मातोश्रींचा मृत्यू झाल्याचे त्यांनी नमूद करत, हा काळ अत्यंत त्रासदायक असल्याचे सांगितले.

संदिप पाटील यांनी हुंडामुक्त, साध्या पद्धतीने विवाह करून समाजात आदर्श प्रस्थापित केला होता. तरीसुद्धा त्यांच्या विरोधात गंभीर आरोप लावले गेले. मात्र, सत्याच्या विजयाने न्याय मिळाल्याचा आनंद त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला.या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. सहदेव बी. पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला, तर सरकारी पक्षातर्फे ॲड. ए. जी. पाटील व सौ. स्वाती निकम यांनी काम पाहिले.

निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना संदिप पाटील यांनी सांगितले, “खोट्या आरोपांमुळे आम्ही मानसिकदृष्ट्या खूप त्रस्त झालो होतो. मात्र शेवटी सत्याचा विजय झाला. आमचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.”

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या