Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeअपघातभाविकांवर काळाचा घाला ; अडावद जवळील भीषण अपघातात गोजोरा येथील दोघे ठार...

भाविकांवर काळाचा घाला ; अडावद जवळील भीषण अपघातात गोजोरा येथील दोघे ठार !

जळगाव | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- मध्यप्रदेशातील भिलट बाबांच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघालेल्या दोन भाविकांना बोलेरो वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (२८ जुलै) सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास अडावद-चोपडा रस्त्यावर घडली.

या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथील रहिवासी महेंद्र शांताराम भोळे आणि युवराज तुकाराम तायडे हे दोघेही भिलट बाबांच्या दर्शनासाठी दुचाकीने मध्यप्रदेशात निघाले होते. दरम्यान, अडावद येथील शेतकी शाळेजवळ समोरून भरधाव आलेल्या बोलेरो वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अडावद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांनी देखील मदतीसाठी धाव घेतली. मृतदेह तातडीने चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी मृत व्यक्तींच्या कुटुबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. अडावद पोलीस अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या