Thursday, November 21, 2024
police dakshta logo
Homeजळगावॲड.स्व.सतीश परदेशी व प्रल्हाद परदेशी यांच्या पुण्यस्मरण निमित्त अन्नदान व मार्गदर्शन शिबीर...

ॲड.स्व.सतीश परदेशी व प्रल्हाद परदेशी यांच्या पुण्यस्मरण निमित्त अन्नदान व मार्गदर्शन शिबीर…

दुर्गम भागातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – न्या. सैय्यद

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह – जळगाव शिवाजीनगर परिसरातील रहिवाशी अँड. सतीश परदेशी व प्रल्हाद परदेशी यांचा तृतीय पुण्यस्मरण निमित्त तंट्या भिल झोपडपट्टी भागातील २०० नागरिकांना अन्नदान व विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन शंकर परदेशी, गंगाबाई परदेशी, छाया केळकर यांनी केले.

सर्वप्रथम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव सचिव व वरिष्ठ न्यायाधीश एस.पी.सैय्यद यांनी आपल्या कार्यालया अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली .तसेच त्यांचा अडचणी जाणून घेतल्या. अँड. सोनार व विधी सहाय्यक भारती कुमावत, अँड.ऐश्वर्या मंत्री यांनी बाल संरक्षण व मानवी तस्करी, महिलांचे हक्क व अधिकार, शासकीय योजनांची माहिती दिली. सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगांव व वरीष्ठ न्यायाधीश एस.पी. सैय्यद यांचा हस्ते अन्नदान करण्यात आले.

प्रमुख उपस्थिती एस.पी.सैय्यद (वरिष्ठ न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगांव),अँड. सोनार, विधी सहाय्यक भारती कुमावत, अँड. ऐश्वर्या मंत्री, मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख उपस्थित होते.
संतोष केळकर, राखी परदेशी, रसिका परदेशी, महेंद्र परदेशी, रोशनी फरसे,प्रेम केळकर यांचे श्रमिक योगदान लाभले. फिरोज शेख अध्यक्ष मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन यांचे अनमोल सहकार्य लाभले. सूत्रसंचालन मीना परदेशी यांनी केले तर आभार प्रदर्शन छाया केळकर यांनी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या