जुन्या धरणार अधिग्रहित जमिनीत आंब्याची झाडे जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव तापी पाटबंधारे अंतर्गत केंद्र शासनाच्या निधीतून जळगाव तालुक्यातील भागपूर येथे भागपुर उपसा सिंचन योजना मंजूर असून त्यासाठी भागपुर शिवारातील जमीन शासनाने अधिग्रहित केलेली आहे. शासनाच्या नियमानुसार शासनाने अधिग्रहित केलेल्या जमिनी वरती कोणत्याही प्रकारची फेरफार करता येत नाही. व त्यासाठी शासनामार्फत शेतकऱ्यांना नोटीसही दिल्या असून पहिल्या टप्प्यातील धरणात गेलेल्या अधिग्रहित शेती मालकांना तक्रार कायम ठेऊन शासकीय मोबदला अदा केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,भागपूर् शिवारातील शेत (गट नंबर ८) मधील शेती हे भागपूर येथील जुन्या मातीच्या धरणासाठी अधिग्रहित केलेली असतांना शेतातून जास्तीचा मोबदला मिळावा यासाठी जुन्या मातीच्या धरणात आंब्यांची झाडे लावून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार मंगळवार दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा प्रकारे शासनाला फसविण्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर शासनाचे कर्मचारी हेमंत मुरलीधर गीरी यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार नेहा जितेंद्र अग्रवाल, जितेंद्र हनुमानदास अग्रवाल, निधी निखील पसारी, अनिता अनुप अग्रवाला सर्व रा. आर.जे.टॉवर, भास्कर मार्केट जळगाव यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अलियार खान करीत आहे.