जळगाव /प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात वाहनांच्या अपघातात खूप वाढ होत आहे.शहरातील मानराज शोरूमजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत उमाळा येथील ३० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर महादू पंगारे (वय-३०) रा. वरखेडी ता. चाळीसगाव ह.मु. उमाळा ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, ज्ञानेश्वर पंगारे हा आपल्या परिवारासह जळगाव तालुक्यातील उमाळे येथे वास्तव्याला होता. एमआयडीसी परिसरात मजूरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. सोमवारी ११ सप्टेंबर रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास पायी घरी जात असतांना सुप्रिम कॉलनी जवळील मानराज शोरूमजवळ अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दुपारी ४ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील प्राथमिक तपास पोलीस करीत आहेत.