पोलीस दक्षता लाईव्ह प्रतिनिधी:- गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान अहमदाबाद मधील मेघांनी नगर परिसरात कोसळल्याचे दुर्घटना घडली आहे. या विमानात एकूण 242 लोक होते दोन वैमानिक दहा crew सदस्य 232 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 169 भारतीय नागरिक 53 ब्रिटिश १ कॅनडा आणि पोर्तुगालच्या ७ नागरिक होते जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विमानाला उड्डाण घेण्यासाठी थोडा उशीर झाल्यानंतर दुपारी १.४७ वाचता विमानाने उड्डाण घेतले होते त्यानंतर अवघ्या नऊ मिनिटात हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. सदर विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील प्रवास करत होते.