Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याब्रेकिंग न्यूज - राज ठाकरें यांचा महायुतीला विनाशर्त पाठींबा जाहीर..

ब्रेकिंग न्यूज – राज ठाकरें यांचा महायुतीला विनाशर्त पाठींबा जाहीर..

मुंबई/पोलीस दक्षता लाईव्ह :- आज गुढीपाडवा निमित्त आयोजित मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला विनाशर्त पाठींबा जाहीर केला आहे.

काही दिवसांपासून राजकीय जाणकार राज ठाकरे हे महायुतीमध्ये सहभागी होतील असे भाकीत करत होते. आणि तशी राज्यभरात चर्चाही सुरू होती. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर याबाबत चर्चेला उधाण आले होते. तेव्हाच राज ठाकरे यांनी अमित शहा यांना महायुतीला पाठिंबा देण्याबाबतचा शब्द दिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भाजप सरकारने केलेल्या कामांचा उल्लेख करतांना सर्वप्रथम मोदींनी पंतप्रधान व्हावे ही अपेक्षा आपणच स्वतः व्यक्त केल्याचे स्पष्ट केले. त्याबरोबरच त्यांनी आपण महायुतीला विनाशर्त पाठींबा देत असल्याची अधिकृत घोषणाही केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या