Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या ५ राज्यांचा निवडणूक कार्यक्रम...

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या ५ राज्यांचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर

नवी दिल्ली /पोलीस दक्षता लाईव्ह टीम:– मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची अखेर निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे.नोव्हेंबर २०२३ मध्ये या ५ राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. छत्तीसगडमध्ये २ टप्प्यात, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणामध्ये १ टप्प्यात मतदान होणार आहे. या ५ राज्यांच्या निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबर २०२३ रोजी लागणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं की, निवडणूक आयोगाने सर्व ५ राज्यांचा दौरा केला. सरकारी संस्था, राज्य सरकार यांच्यासोबत बैठक घेतली.

मिझारोमचा कार्यकाळ २०२३ रोजी संपतोय तर इतर ४ राज्यांचा कार्यकाळ जानेवारी २०२४ मध्ये संपणार आहे. या ५ राज्यात ६७९ विधानसभा जागा आहेत. त्यात १६.१४ कोटीहून अधिक मतदार आहेत. यामध्ये ८.२ कोटी पुरुष मतदार तर ७.८ कोटी महिला मतदार आहेत. या राज्यांमध्ये ६० लाख असे मतदार आहेत जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्याचसोबत १७ ऑक्टोबरपासून मतदार यादी जारी केली जाईल. १७ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही मतदाराला मतदार यादीत काही बदल करायचे असतील तर करू शकतात. या ५ राज्यात १.७७ लाख पोलिंग बूथ बनवले जातील. मतदान केंद्र २ किमी अंतरातच असतील. आदिवासी भागात विशेष मतदान केंद्र उभारली जातील.

5 राज्याची स्थिती …

यापूर्वी २०१८ साली निवडणूक आयोगाने ६ ऑक्टोबरला या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली होती. त्यावेळी छत्तीसगढ वगळता उर्वरित राज्यांमध्ये एका टप्प्यात १२ नोव्हेंबरला मतदान झाले होते. छत्तीसगढमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान २० नोव्हेंबरला पार पडले होते. यानंर ११ डिसेंबरला पाचही राज्यांमध्ये मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला होता.

सध्याच्या घडीला मध्य प्रदेशातील विधानसभेच्या २३० जागांपैकी १२८ जागा भाजपकडे आणि ९८ जागा काँग्रेस पक्षाकडे आहेत. राजस्थानमध्ये एकूण २०० जागा आहेत. यामध्ये काँग्रेसचे १०८, भाजपचे ७०, आरएलडीचा एक, आरएलएसपीचे तीन, बीटीपी आणि डाव्यापक्षाचे प्रत्येकी दोन आणि १३ अपक्ष आमदार आहेत. छत्तीसगडमध्ये ९० जागा आहेत. त्यात काँग्रेसचे ७१, भाजपचे १५, बसपाचे दोन आणि जेजेएसचा एक आमदार आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या