Sunday, July 13, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याअमळनेर येथे डॉक्टर कडून महिला पेशंटचा विनयभंग; गुन्हा दाखल

अमळनेर येथे डॉक्टर कडून महिला पेशंटचा विनयभंग; गुन्हा दाखल

अमळनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- अमळनेर येथे बुधवारी दिनांक 23 रोजी डॉक्टर या पेशाला काळीमा फासणारी घटना घडली असून उपचारासाठी आलेल्या रुग्ण महिलेचा विनयभंग झाल्याच्या आरोपाखाली डॉक्टर अनिल शिंदे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की चोपडा तालुक्यातील एक महिला उपचारासाठी अमळनेर येथील नर्मदा हॉस्पिटल येथे आली असता. डॉक्टर ने आपला विनयभंग केल्याचे महिलेचे म्हणणे आहे. या प्रकारची माहिती समजताच मोठ्या मोठ्या प्रमाणात जमाव जमला. डॉक्टरला बाहेर काढा व आमच्या ताब्यात द्या अशी मागणी जमावाने केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता परिस्थिती हाताळण्यासाठी डीवायएसपी सुनील नंदवाळकर आणि पोलीस निरीक्षक विजय शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. डॉक्टर अनिल शिंदे यांच्याविरुद्ध विनयभंगासह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार अंमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डीवायएसपी सुनील नंदवाळकर करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या