Sunday, September 15, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याअमळनेर तालुक्यातील गांधलीजवळच्या भीषण अपघातात वयोवृद्ध दाम्पत्य ठार

अमळनेर तालुक्यातील गांधलीजवळच्या भीषण अपघातात वयोवृद्ध दाम्पत्य ठार

अमळनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. गेल्या आठवड्यात विविध घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे.भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने उभ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य हे जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी ४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील गांधली रोडवरील सप्तश्रृंगी मंदिराजवळ घडली.युवराज दयाराम पाटील (वय-६२) आणि त्यांची पत्नी मंगलबाई युवराज पाटील (वय-५५) दोन्ही रा. पिळोदा ता.अमळनेर असे मयत झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.या घटनेाबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अमळनेर तालुक्यातील पिळोदा येथील युवराज पाटील हे आपल्या पत्नी मंगलबाई पाटील यांच्यासोबत पारोळा येथे गेले होते. सोमवारी सायंकाळी घरी दुचाकी (एमएच १९ एके ५२५०) ने परतत असतांना गांधली गावानजीक सप्तश्रृंगी मंदिराजवळ त्यांची दुचाकी उभ्या ट्रॅक्टर (एमएच १९ सीव्ही १६३२) वर आदळली.हा अपघात एवढा भीषण होता की, युवराज पाटील याचा जागीच मृत्यू झाला तर मंगलबाई पाटील या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. अपघात घडल्यानंतर रोडवरील वाहनधारकांनी रस्त्यावरच वाहने थांबवून अपघात ग्रस्तांना बचाव कार्याला मदत केली. जखमी मंगलबाई यांना तातडीने खासगी वाहनातून अमळनेर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या उपचार करण्यापुर्वीच त्यांची प्राणज्योत मालविली होती.

या घटनेमुळे पिळोदा गाव सुन्न झाले होते. होत्याचे न होते अशी घटना झाल्याने त्यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह अमळनेर ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. या घटनेप्रकरणी अक्षय किशोर पाटील (वय-२७) रा. पिळोदा ता.अमळनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकाविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा पिंगळे हे करीत आहेत.

जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यातच जास्त प्रमाणात अपघात होत असल्याचे निदर्शनास येते आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या