Thursday, November 21, 2024
police dakshta logo
Homeजळगावअमळनेरात डेंग्यूचे पुन्हा ६ रुग्ण आढळले; भीतीचे वातावरण; आरोग्य पथकातर्फे सर्व्हे सुरू..!

अमळनेरात डेंग्यूचे पुन्हा ६ रुग्ण आढळले; भीतीचे वातावरण; आरोग्य पथकातर्फे सर्व्हे सुरू..!

अमळनेर/ पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव जिल्ह्यात भुसावळ,बोदवड,जळगाव शहर परिसर आणि विविध शहरासह ग्रामीण भागातही डेंग्यूची लागण होवू लागली आहे. जळगाव शहरात एका १४ वर्षीय शाळकरी मुलाचा तर तर मेहरूण परिसरातील ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ओढवला आहे.अमळनेर शहरात आधी तीन रुग्ण आढळले होते. आता आणखी चार तर ग्रामीण भागात एक असे पाच डेंग्यू रुग्ण आढळून आले आहेत.

शहरात आरोग्य पथकातर्फे सर्वे करून कंटेनर खाली करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसात गांधलीपुरा, मेहतर कॉलनी भागात २२ वर्षीय तरुण, ओम शांतीनगर भागातील १७ वर्षीय तरुणी, पटवारी कॉलनीतील १६ वर्षीय युवक, अमलेश्वरनगर भागातील २२ वर्षीय तरुण आणि तासखेडा येथील सहा वर्षाच्या बालकाला डेंग्यूची लागण झाली आहे. अमळनेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी आणि नगरपालिकेचे डॉ विलास महाजन यांनी शहरातील रुग्ण आढळलेल्या भागात आशा स्वयंसेविका, परिचारक व आरोग्य सेवक यांच्या पथकाकडून सर्वेक्षण सुरू केले आहे.

सार्वजनिक ठिकाणी डबके, घराबाहेर असलेल्या पाण्याच्या टाक्या, हौद, फ्रीजचे भांडे, टायर, कुलर, छतावरील साचलेले पाण्याचे नमुने तपासले जात आहेत.अनेक घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. घरातील सदोष भांडे रिकामे करण्यात आले आहेत. तर सार्वजनिक ठिकाणची डबके जेथे पाणी काढता येत नाही त्याठिकाणी ऑइल टाकण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी,पाणी साठवू नका असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या