Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणअमळनेरात दुकानावर मराठी फलक लावण्याबाबत मनसेचे मनपाला निवेदन

अमळनेरात दुकानावर मराठी फलक लावण्याबाबत मनसेचे मनपाला निवेदन

अमळनेर/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अमळनेर न.प.मुख्याधिकारी यांना शहरात दुकानांवर मराठी भाषेत फलक लावण्याबाबत निवेदन देण्यात आले.

दि.२५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मराठी भाषेत फलक लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. तरी अजूनही अमळनेर शहरातील काही दुकानांचे फलक इंग्रजी अक्षरात असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी अमळनेर न.प.मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्या निवेदनात संबंधीत दुकानदारांना नोटीस देऊन त्यांना मराठीत फलक लावण्या बाबत समज द्यावी.तसेच दुकानदार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत नाही म्हणून त्या दुकानदारांवर कारवाई करावी. अन्यथा महारष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ह्या संदर्भात आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देताना तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे), शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, शहर उपाध्यक्ष करण पाटील, शहर सचिव संकेत पाटील, शहर उपाध्यक्ष गजानन गोसावी, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गोपाल पाटील, शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष हर्षल पाटील, आदित्य पगारे, विद्यार्थी सेनेचे राहुल शेलार, गट अध्यक्ष श्यामकांत बडगुजर, संदीप पाटील, योगेश पाटील, दिनेश पवार, प्रोमोद पाटील, आकाश पाटील, रुपेश पाटील, व मोठ्या प्रमाणात मनसे सैनिक उपस्थित होते

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या