अमळनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- अमळनेर तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील (वय 90 मूळ रा.दहिवद) यांचे काल दि.22 रोजी मंगळवारी संध्याकाळी 7 वा.दरम्यान ढेकू रोड परिसरातील निवासस्थानी वृध्दप काळाने निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा दि.23 बुधवार रोजी दुपारी 2 वाजल्या पासून त्यांच्या दहिवद येथील घरून निघणार आहे. अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयात त्यांचे पार्थिव सकाळी सात ते आठ या वेळेत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव येथून सकाळी सकाळी आठ वाजता दहिवद येथे अंत्ययात्रेसाठी नेले जाईल. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शिंगाडे मोर्चा काढून लोकप्रियता मिळवली होती. तसेच ते जनता दलाचे तालुक्याचे आमदार होते. ते तीन टर्म (13) वर्ष आमदार राहून चुकलेले असून खान्देशात त्यांची ओळख मुलुख मैदान म्हणून केली जात होती.
अमळनेर चे माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे निधन
अमळनेर चे माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे निधन