Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeक्राईमअनैतिक संबंधात आड येणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्याची हत्या

अनैतिक संबंधात आड येणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्याची हत्या

पुणे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:– पुण्यात सिंहगड रोडच्या एका तरुणाची रायकर मळा परिसरात एका अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आल्याने एक खळबळजनक असा प्रकार समोर आला असून, ज्याची हत्या करण्यात आली तो महावितरणचा कर्मचारी असल्याची देखील माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळ कैलास मंडवे (वय 32) रा. ओवी आंगण कॉलनी, जाधवनगर, रायकर मळा असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून सिंहगड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. अनैतिक संबंधास विरोध केल्याने हा खून झाल्याची प्राथमिक माहिती असून सिद्धांत दिलीप मांडवकर (वय 19) रा. धायरेश्वर मंदिराजवळ, धायरी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

गोपाळ मंडवे महावितरण केंद्रात पर्वती उपविभागात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कामाला होते. त्यांच्या ओळखीतील एका महिलेशी आरोपी मांडवकर याचे अनैतिक संबंध होते. याच्या कारणावरून सोमवारी मांडवकर आणि मंडवे या दोघात वाद झाला. त्यावेळी मंडवे यांनी त्याला दुचाकीवर बसवत धायरीतील रायकर मळा भागात नेले आणि तिथे मांडवकरने त्याच्याकडील चाकूने मंडवे यांच्यावर अमानुषपणे वार केले त्यात त्यांचा मृत्यू झाला.

गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी धनंजय ताजणे यांना पसार झालेला मांडवकर कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी महाविद्यालय परिसरात थांबला असल्याचे कळाले. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मांडवकरला पकडले. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, उपनिरीक्षक शाहीद शेख, प्रदीप राठोड, मॅगी जाधव, गणेश ढगे, शवाजी सातपुते, नारायण बनकर आदींनी ही कारवाई केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या