Sunday, September 15, 2024
police dakshta logo
Homeजळगावअंजनसोंडे शेती शिवारात बिबट्याचा वावर : दोन कुत्री केली फस्त: शेतकऱ्यां मध्ये...

अंजनसोंडे शेती शिवारात बिबट्याचा वावर : दोन कुत्री केली फस्त: शेतकऱ्यां मध्ये भीतीचे वातावरण..

वरणगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर, जामनेर तालुक्यात बिबट्यांचा वावर दिसून आला होता व दोन शेतकऱ्यांवर हल्लेही झालेत ,त्या घटनेला एक महिना उलटच नाही तोच भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडे शेती शिवारात गेल्या दोन दिवसात बिबट्याने कुत्र्याचा फडशा फाडल्याने या परिसरात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

आयुध निर्माणी परिसरातील जंगल भागासह आता अंजनसोंडा शेती शिवारात बिबट्याचा शिरकाव झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शेती मधील गोठ्यात राहणारे पाळीव कुत्र्यावर हल्ला चढवत दोन कुत्री बिबट्याने फस्त केली आहे असाच प्रकार सोमवारच्या रात्री गोविंदा राणे यांच्या गोठ्यातील कुत्र्याचा फडशा पाडल्याचे मंगळवारी सकाळी समोर आले.यामुळे या परिसरात असलेल्या शेती मध्ये पिकांना पाणी देण्यासाठी किंवा शेती कामाला जाण्यास शेतकरी धाडस करीत नसून त्यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.बिबट्याचा वन विभागाने लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी गावकरी आणि शेतकरी वर्गातून होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या