Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeखेळ जगतअनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सलग तिसऱ्यांदा खो-खो स्पर्धेत विजयाचा बहारदार पराक्रम

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सलग तिसऱ्यांदा खो-खो स्पर्धेत विजयाचा बहारदार पराक्रम

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव महानगरपालिकास्तरावरील आंतरशालेय खो-खो स्पर्धा दिनांक २१ ते २२ सप्टेंबरदरम्यान जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत विविध शाळांनी सहभाग नोंदविला होता.

१७ वर्षांखालील मुलांच्या गटात अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या खेळाडूंनी दमदार खेळ सादर करत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावून अभूतपूर्व यश संपादन केले. या विक्रमामुळे विद्यार्थ्यांनी शाळेच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेस गौरवाचा क्षण लाभला असून हे यश सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. व्यवस्थापनाकडून मिळणाऱ्या सातत्यपूर्ण प्रोत्साहनामुळेच हा पराक्रम शक्य झाल्याची भावना खेळाडू व प्रशिक्षकांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षिका श्वेता कोळी व आकाश धनगर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी संघाचे कौतुक शाळेचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी, तसेच मनोज दाडकर, रूपाली वाघ व इतर शिक्षकांनी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या