Sunday, September 15, 2024
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणमनसे जिल्हाअध्यक्ष मुकुंदा रोटे यांना वाढदिवसाची अनोखी भेट; नशिराबाद येथील असंख्य तरुणांचा...

मनसे जिल्हाअध्यक्ष मुकुंदा रोटे यांना वाढदिवसाची अनोखी भेट; नशिराबाद येथील असंख्य तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश..!

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह:- मनसे अध्यक्ष मा.राज साहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन दिनांक १८ मार्च रोजी जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नशिराबाद येथील असंख्य तरुणांनी पक्षाचे नेते अँड. माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला.

दरम्यान यावेळी नशिराबाद येथील महाजन हॉटेलचे संचालक श्री राहुल महाजन यांना उपतालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली, तसेच नांद्रा येथील सुनील सोनवणे यांना तालुका संघटक, तसेच वडनगरी येथील गोरख गायकवाड यांना गणाध्यक्ष, तसेच हर्षल इंदरकर यांची उपतालुका अध्यक्ष जळगाव पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी जळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे दुसरे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, नशिराबाद शहराध्यक्ष जितेंद्र बराटे, जळगाव तालुका उप तालुकाध्यक्ष शैलेंद्र चौधरी, राहुल महाजन, गणेश सपकाळे, भावेश रोटे, दीपक जावळे, पवन कोल्हे, रोहित माळी, तुषार चौधरी, सुमित पवार,मुक्तार खान, अजित खान, मयूर शिंपी, विलास भोई, आकाश सोनवणे, अमोल सोनवणे, भूषण सोनवणे, जितेंद्र माळी, चेतन पाटील, निवृत्ती बाबा, तसेच असंख्य तरुण यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या