Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावअट्टल गुन्हेगार अरुण गारुंगेवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई; नागपूर कारागृहात स्थानबद्ध

अट्टल गुन्हेगार अरुण गारुंगेवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई; नागपूर कारागृहात स्थानबद्ध

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-  एमपीडीए कायद्यांतर्गत रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबध्द करण्याचे आदेश काढले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. विश्वास अरूण गारूंगे (वय-४२) रा. समता नगर, जळगाव असे हद्दपार केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विश्वास अरूण गारूंगे हा गुन्हेगार परिसरात अवैधरित्या गावठी दारू बनविणे आणि त्याची विक्री करणे तसेच शासनाच्या आदेशाने उल्लंघन करणे असे वेगवेगळ्या स्वरूपाचे एकूण १८ गुन्हे रामानंदनगर पोलिसात दाखल आहेत. शिवाय त्याच्यावर या आधी ४ वेळा प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. परंतू त्याच्या कोणतीही सुधारणा झाली नसल्याने रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी अहवाल तयार करून जिल्हा मुख्यालयात पाठविला. रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे प्रस्तावाचे अवलोकन करून जिल्हाधिकारी कार्यालयात रवाना केला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आलेल्या प्रस्तावानुसार अरूण गारूंगे याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या