जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- येत्या 11 फेब्रुवारीला जळगाव येथील सरदार पटेल लेवा भवन येथे बहिणाबाई- सोपानदेव साहित्य संमेलन होत आहे.खान्देशात प्रथमतः ‘ बहिणाबाई सोपानदेव चौधरी ‘ संमेलनाचे आयोजन ‘ मालतीकांत ‘ अर्थात पुरुषोत्तम चावदस नारखेडे ( महात्मा गांधी विद्यालय,भादली ) यांनी सन १९९९ मध्ये घेतले .त्यांनी व्रतस्थपणे सलग सोळा संमेलने यशस्वीरित्या घेतली. प्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांना पाचारण करून अविस्मरणीय वाङ्मयीन तसेच बौद्धिक मेजवानी जळगावकरांना दिली.तथापि त्यांच्या निधनानंतर आता नव्याने त्यांचा वारसा अखंडित ठेवण्याचा निर्धार सुपुत्र लीलाधर नारखेडे व डॉ.विलास नारखेडे यांनी केला आहे.
पवन चॅरीटेबल ट्रस्ट आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलनाचे आयोजन.
निर्धारपूर्वक उद्दिष्टाने पवन चॅरीटेबल ट्रस्ट आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सतरावे खान्देशस्तरीय संमेलनाचे आयोजन केले आहे.संमेलन नियोजन बैठक रघुनाथ राणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.संमेलनाची रुपरेषा व कार्यवाहीच्या दृष्टीने विलास नारखेडे यांनी अनेकविध अमूल्य सूचना मांडल्या. सुचनांवर कार्यकारीणीत सांगोपांग चर्चा करण्यात आली.ट्रस्टचे उपाध्यक्ष रघुनाथ राणे यांनी संमेलनाच्या यथोचित यशस्वीतेसाठी वेगवेगळ्या समित्यांचा प्रस्ताव मांडल्यानंतर सांगोपांग चर्चा करण्यात आली.त्यानुसार राज्यस्तरावर वाङ्मयीन योगदान लक्षात घेऊन खान्देशातील मान्यवर साहित्यिक व साहित्यिक चळवळीतील संघटकांची नावे उपस्थितांनी सुचविल्यानुसार सांगोपांग चर्चा करण्यात आली.
सर्वानुमते १७ वे बहिणाबाई सोपानदेव चौधरी खान्देशस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी धरणगाव येथील साहित्यिक कवी संजीवकुमार सोनवणे धरणगाव तर उद्घाटक म्हणून जळगावचे आमदार सुरेश तथा राजू मामा तसेच कवी संमेलनाचे अध्यक्ष मालेगाव येथील ज्येष्ठ कवी राजेंद्र दिघे यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली.जळगाव येथील जेष्ठ साहित्यिक तथा लेवा गणबोलीचे अभ्यासक डॉ.अरविंद नारखेडे यांची स्वागताध्यक्षपदी तसेच संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी लेवा गणबोली साहित्य मंडळाचे सचिव,कवी तथा कलावंत तुषार वाघुळदे आणि कवी विजय सुपडू लुल्हे यांची निवड करण्यात आली.संमेलनाच्या समारोप अध्यक्षपदी प्रा.डॉ. वासुदेव सोमाजी वले ( पाचोरा ) यांची बहुमताने निवड करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी सर्वश्री खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश दामू भोळे उर्फ राजूमामा , कवी वा.ना.आंधळे, शशिकांत हिंगोणेकर, सुनील इंगळे ,डोंबिवली ,प्रा. बी .एन. चौधरी धरणगाव, सुनील खडके ,माजी महापौर नितीन लढ्ढा. भगवान भटकर ,अशोक पारधे, शैलजा करोडे ,प्रा. डॉ. अ. फ. भालेराव ,प्रा. डॉ. वंदना बडगुजर, प्रा. सत्यजीत साळवें ,सुनील इंगळे ,स्मिताताई चौधरी प्रमिला भिरूड ,शिवलाल बारी, माजी महापौर विष्णू भंगाळे, नगरसेवक अमित काळे ,माजी महापौर जयश्री महाजन, धनंजय गुडसुरकर (उदगीर ),पुष्पराज गावंडे, ,(अकोला) ,सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अशा मान्यवरांची उपस्थिती आणि त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.विविध समित्यानिहाय जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रातील गुणवंतांना आणि विशेषत्वे कवी व साहित्यिकांना वांग्मयीन प्रकारानुसार एकूण बारा पुरस्कार दिले जाणार.
संमेलनाच्या औचित्याने शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रातील गुणवंतांना आणि विशेषत्वे कवी व साहित्यिकांना वांग्मयीन प्रकारानुसार एकूण बारा पुरस्कार दिले जाणार आहेत. असे ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.विलास नारखेडे यांनी सांगितले.सदरहू पुरस्कार संमेलनापूर्वी जाहिर करण्यात येऊन पुरस्कारार्थींचा संमेलनाच्या समारभाप्रसंगी आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात येईल.
सदरहू बैठकीस ट्रस्टचे पदाधिकारी व आयोजन समिती सदस्य कार्याध्यक्ष पत्रकार तुषार वाघुळदे , संजय पाटील, साधना लोखंडे,सुधाकर सपके, हरिष सोनार,हितेश नारखेडे यांसह संतोष पाटील, राजेश वाणी आणि हितचिंतक सभासद उपस्थित होते.
बहिणाई सोपानदेव संमेलनाच्या औचित्याने वाड्मयीन पुरस्कार जाहीर..
सतरावे बहिणाई सोपान देव खान्देश मराठी राज्य साहित्य संमेलन जळगाव येथे दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न होत आहे त्या औचित्याने उत्कृष्ट साहित्यकृतींना पारितोषिक देऊन लेखकांना सन्मानित करण्याच्या उद्दिष्टाने आवाहन करून साहित्य मागविण्यात आले होते. स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला.काव्य संग्रह सर्वाधिक आले. मूल्यमापनाअंती वाङमय प्रकारानुसार साहित्यकृतींना पुढील पुरस्कार देण्यात आले.
काव्यलेखन :- बालकविता – प्रथम – चिमणी उडाली भुर्र sss – सौ.माया दिलीप धुप्पड, द्वितीय (विभागून ) १ ) पाऊस शाळा – रविंद्र सोनवणे २ )मुलं जमिनीवरचे तारे – गोविंद पाटील अहिराणी काव्य- मोहन पाटील (सर्वे) पाचोरा. प्रौढ काव्यलेखन – प्रथम ( विभागून ) – १ ) बाई अन् कविता – जयवंत बोदडे २ ) जावे गुंफित अक्षरे – सौ.संध्या भोळे, द्वितीय : – ( विभागून ) १) मनाच्या व्यथा – पुष्पा साळवे, २ ) क्रांती लहर – अजय भामरे
तृतीय ( विभागून ) – १ ) पालवी – इंदिरा जाधव २ ) भावनांचे लावण्य – धनश्री रमेश मिस्तरी, उत्तेजनार्थ – पांगल्या पायवाटा : – तुकाराम पाटील पाळधीकर , देवाचिये द्वारी – प्रा.पुरुषोत्तम पटेल ” पुष्प ”
कथालेखन : – प्रथम – मनोबल तिमिरातून तेजाकडे : चित्रा वाघ द्वितीय – वाटणी : दीपक तांबोळी, तृतीय – सत्यशोधक आणि इतर कथा : प्रा.भरत आ.शिरसाठ, विशेष ललीत गद्य पुरस्कार – स्मृतिगंध माझं अमळनेर – ॲड. प्रदीप कुळकर्णी
ललित:- स्वातीचे थेंब – प्रा. पुरुषोत्तम पटेल ” पुष्प “ कादंबरी : – दयन – युवराज मेघराज पवार, अध्यात्मिक – कृष्णगंध (कविता ) – रितेश अत्तरदे, समिक्षा :- रंगू कविते संगे – प्रा. अरुण सु.पाटील व सौ.वसुंधरा अरुण पाटील, व्यक्तिमत्व विकास – प्रथम – ‘ सुसंस्कृत व्यक्तिमत्व – प्रा.डॉ.एल.ए.पाटील
द्वितीय – स्वप्नांचा जीवन प्रवास : ऋषीकेश माधवराव पाटील ( पथराड ), शैक्षणिक : – प्रथम – विनोबांची शिक्षणछाया : संदीप वाकचौरे, द्वितीय – सारथी ( स्पर्धा परीक्षांचा सर्वकष माहितीकोश ) परीक्षा – प्रा.राजेंद्र चिंचोले, वैचारीक – प्रथम – सुखी संसारासाठी : प्रा.देवबा शिवाजी पाटील द्वितीय – बुध्द : गौरवशाली मार्गदाता – चित्रा भारत पगारे, संशोधनात्मक – ( लोकसाहित्य अन् कला ) – खान्देशचा लोकनाट्य तमाशा : देविलाल वाघु बाविकर, चरित्र : – पीटर ताबीची ( आग्रह ‘ जीवन ‘ शिक्षणाचा ! – चंन्द्रकान्त भंडारी ), द्वितीय – त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर, तृतीय:- (अनुवाद ) – प्रा.डॉ . श्रीकांत तारे ( राजमाता श्रीमंत बायजाबाई शिंदे – मुळ लेखक : डॉ.अजय अग्निहोत्री ) आत्मचरित्र : – काळया निळया रेषा – राजू बाविस्कर, पोवाडा : – ( प्रथम ) – शिवाजीराव पाटील, द्वितीय :- शाहिरी मानवंदना – निंबा पुना बडगुजर , पर्यावरण : – महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसुबाई शिखर सर करण्याचा माझा रोमांचकारी अनुभव – श्रीमद् प्रशांत बजगुजर, क्रिडा :- म – ‘ मॅरेथॉन ‘ चा ( कहाणी एका आरोग्यदायी चळवळीची ) डॉ.संदिप सूर्यकांत काटे, शितल शांताराम पाटील-– (लेवा गणबोली)
सदरहू निकाल डॉ.विलास नारखेडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये अधिकृत घोषित केला.
स्पर्धेसाठी आलेल्या साहित्यकृतींचे मूल्यमापन नाट्यछटाकार अरविंद नारखेडे व कवी विजय सुपडू लुल्हे यांनी अल्पावधीत करून दिले. साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात पुरस्कारार्थी साहित्यिकांना स्मृतिचिन्ह आणि सन्मान चिन्ह दिले जाईल.पुरस्कारार्थींनी प्रत्यक्ष हजर राहून सन्मान स्विकारावा. सन्मानचिन्ह हस्तांतरित होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. कार्यक्रमाचा पुरस्कारार्थींनी यथोचित लाभ घ्यावा असे आवाहन संमेलनाचे निमंत्रक डॉ.विलास नारखेडे,लीलाधर नारखेडे कार्याध्यक्ष तुषार वाघुळदे व विजय लुल्हे तसेच आयोजक रघुनाथ राणे व डॉ.संजय पाटील यांनी केले आहे.